
दहिवडी : मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांच्या सोयीसुविधांचा प्रश्न महत्वाचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा आणि अन्य अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली.