
Minister Shivendraraje Bhosale addressing a meeting in Medha; assures full support to Bondarwadi project-affected families.
Sakal
केळघर : जावळी तालुक्यातील ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरणाचा प्रकल्प महत्त्वाचा आहे. बोंडारवाडी, भुतेघर, वाहिटे या बाधित क्षेत्रातील गावांनी माझ्यावर विश्वास ठेवून ट्रायलपीटसाठी परवानगी द्यावी. ट्रायलपीट घेतली म्हणजे लगेच धरण होईल, असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. ज्याठिकाणी योग्य असेल त्याच ठिकाणी प्रकल्प मार्गी लावू, कोणालाही वाऱ्यावर सोडून हे धरण पूर्ण केले जाणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.