esakal | नागठाण्यात दारूच्या नशेत पत्नीचा खून; संशयित पतीला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Borgaon Police

बबन हा पत्नी मालन यांच्यासह येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेसमोरील (Zilla Parishad School) चाळीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे.

नागठाण्यात दारूच्या नशेत पत्नीचा खून; संशयित पतीला अटक

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (सातारा) : दारूच्या नशेत पतीने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी (Nagthane Police) संशयित पतीस अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालन बबन गायकवाड (वय ५५, रा. नागठाणे, ता. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. बबन बाबुराव गायकवाड (वय ६0) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. (Borgaon Police Arrested One People From Nagthane Crime News bam92)

बबन हा पत्नी मालन यांच्यासह येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेसमोरील चाळीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. हे दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. बबन यास दारु पिण्याचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी मालन या घरात मृतावस्थेत पडल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. याबाबतची माहिती बोरगाव पोलिसांना (Borgaon Police) मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार राकेश देवकर, राजू शिखरे, विशाल जाधव, प्रकाश वाघ, अमित पवार, महिला पोलिस शीतल शिंदे व चालक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरवात केली. मृत मालन यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर मारहाणीच्या गंभीर जखमा तसेच अंगावर मारहाणीचे वळ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा: गोवा बनावटीची दीड लाखांची दारू जप्त

या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून पती बबन याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता पती पत्नीत दारूच्या कारणावरून वाद होत असत. यावरून सोमवारी रात्री उशिरा दोघांत जोरदार भांडण झाले. याचे पर्यावसान मारामारीत होऊन बबन याने मालन यांना लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी बबन याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

Borgaon Police Arrested One People From Nagthane Crime News bam92

loading image