चिकन वाटल्याने गुन्हा दाखल झाला ना भाऊ!

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 13 January 2021

संबंधितांविराेधात निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र शिवराम साबळे यांनी तक्रार दिली

सातारा : राज्यातील बुहतांश ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी (ता. 15) विविध गावांमध्ये निवडणुकीसाठी मतदान हाेणार आहे. बहुतांश गावांत आपले पॅनेल निवडून यावे यासाठी कार्यकर्त्यांचा जाेरदार प्रचार सुरु आहे. सातारा तालुक्यातील नेले गावात मतदारांना आकर्षित करण्यासाठी चिकनचे वाटप केल्याचा प्रकार घडला आहे.

काही गावांमध्ये निवडणुकी निमित्त ढाब्यांवर, हाॅटेलवर पार्टीचे आयाेजन केले जात आहे. काही गावांमध्ये युवा वर्गाच्या माध्यमातून मतदान कशा पद्धतीने करावे, काेणत्याही अमिषाला बळी पडू नका असे प्रबाेधन केले जात आहे.

सरपंचपद नकाे रे बाबा ! का आमच्या गावाला बदनाम करालायस ?

सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील नेले येथील गावात एका पॅनेलकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र शिवराम साबळे यांनी तक्रार दिली. त्यानूसार अनिकेत पिसाळ आणि अशाेक जाधव यांच्या विराेधात पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, मोदी सरकारला पळवाट : माजी मुख्यमंत्र्यांची टीका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Charged On Two Youth From Satara Violating Code Of Conduct Grampanchayat Election News

Tags
टॉपिकस
Topic Tags: