esakal | विद्यालयाच्या मैदानावरील बड्डे पडला महागात; 20 युवकांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यालयाच्या मैदानावरील बड्डे पडला महागात; 20 युवकांवर गुन्हा दाखल

अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शाम बुवा, रत्नदीप भंडारी करीत आहेत.  

विद्यालयाच्या मैदानावरील बड्डे पडला महागात; 20 युवकांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
विलास साळूंखे

सातारा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या जमावबंदी आदेशांचे उल्लंघन करून भुईंज येथे मोठ्या प्रमाणावर जमाव जमवून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी भुईंज परिसरातील सुमारे 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुईंज येथील एका विद्यालयाच्या मैदानावर रवींद्र आबुलाल जाधव याचा वाढदिवस साजरा करण्याकरिता कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कोरोना विषाणू या साथीच्या रोगाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इतरांच्या व स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असताना तसेच वैद्यकीय किंवा अन्य प्रकारची निकड नसताना जमाव जमविण्यात आला.

बंदुकीचा धाक दाखवून कऱ्हाड तालुक्यात पेट्रोल पंपावर दराेडा
 
याप्रकरणी गणेश शिंदे, आशुतोष जाधव, राहुल (आबा) शिंदे, सिध्दार्थ कांबळे, राहुल घाडगे, प्रवीण लोहार, विठ्ठल भोसले, विक्रम जाधव, सुचीत पिसाळ, रोहित पवार, समीर मेंगळे, नीलेश पोतदार व त्याच्या ओळखीचे इतर आठ ते दहा मित्र यांनी तोंडावर व नाकावर मास्क न लावता सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता मोठ्या संख्येने वाढदिवस साजरा करण्याकरिता एकत्र जमल्याने त्यांचेविरुध्द भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढेबेवाडी परिसरातील डोंगररांगांत फुलांचे रंगीबेरंगी गालीचे 
 
अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शाम बुवा, रत्नदीप भंडारी करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar