esakal | UPSC EXAM Indian Engineering Services Examination

बोलून बातमी शोधा

Charudatta Salunkhe
शाब्बास! Indian Engineering Services परीक्षेत चारुदत्तने उभारली यशाची गुढी
sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत कऱ्हाडचा चारुदत्त साळुंखे हा देशात अव्वल ठरला आहे. जिल्हा परिषद शाळा आणि कऱ्हाडच्या शिवाजी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेवूनही 'हमभी कुछ कम नहीं' हेच चारुदत्त याने यातून सिध्द केले आहे.

पाटण तालुक्यातील चाफळ हे चारुदत्त याचे मूळ गाव. त्याचे आई-वडील दोघेही कऱ्हाडला शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांचे वास्तव्य कऱ्हाडमध्येच आहे. चारुदत्तचे प्राथमिक शिक्षण कऱ्हाडच्या आदर्श प्राथमिक विद्यामंदिरमधून पूर्ण झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील शिवाजी हायस्कूलमधून झाले. चारुदत्तने त्याच्या हुशारीची चुणूक दहावीला ९४.५५ टक्के गुण मिळवून दाखवली होती. त्यानंतर त्याने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह मिळवली.

पुणे इंजिनियरिंग कॉलेजला असताना कॅम्पसमधून त्याला खासगी नोकरीच्या संधी आल्या होत्या. मात्र, त्याने त्या नाकारुन शासकीय सेवेत काम करण्याची तयार ठेवली. चारुदत्तने अखिल भारतीय स्तरावर झालेल्या गेट 2020 परीक्षेत देशात ४८ वा क्रमांक पटकवला होता. सध्या तो भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहे. आता त्याने इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावून कऱ्हाडचे नाव देशात उज्वल केले आहे. चारुदत्तच्या या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गुढीपाडवा : कडुलिंब खाण्याच्या परंपरेला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक; गावागावांत शुकशुकाट