
सातारा : गुरुवार परज येथील बिर्याणी हाउसची तोडफोड, तसेच दगड फेकत दोघांना जखमी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अमोल चंदू खवळे, अजय नथू गायकवाड (रा. नामदेववाडी झोपडपट्टी), सूरज कांता दाडे (रा. मोळाचा ओढा), ओमकार राजेंद्र पवार (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्यासह सहा अनोळखींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची तक्रार मुक्तार शेरअली पालकर (रा. शनिवार पेठ) यांनी तक्रार नोंदवली आहे.