
सातारा : साताऱ्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन या संमेलनासंदर्भात आणि मराठी भाषेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. याप्रसंगी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.