esakal | कऱ्हाड : घरांवर काेसळली धुरांडी; साडेतीन लाखांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

logo

कऱ्हाड : घरांवर काेसळली धुरांडी; साडेतीन लाखांचे नुकसान

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील बारा डबरी परिसरातील कचरा डेपो नजीक असलेल्या बायोडेट असोसिएशनच्या जैविक वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पाची धुरांडी साेमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यात कोसळली. ही धुरांडी पाच घरांवर कोसळल्याने माेठा आवाज झाला. या घटनेत घरांचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे.

जैविक कचरा विल्हेवाट प्रकल्प आहे. त्या प्रकल्पात वैद्यकीय कचऱ्याचे विल्हेवाट लावली जाते. त्या प्रकल्पाची सुमारे 300 फूटाची धुरांडी आहे. त्याची पाईप रात्री नऊच्या सुमारास सुटलेल्या वादळी वाऱ्यात कोसळली.

संकट काळातून बाहेर पडण्यासाठी कऱ्हाडातील 300 युवकांचे याेगदान

ही धुरांडी नजीकच्या झोपडपट्टीवर कोसळली. त्यात झोपडपट्टीतील घरांचे मोठे नुकसान झाले. पाच घरांचे तब्बल साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. धुरांडी कोसळल्याने घरांच्या भिंतीना तडा गेला आहे. काही घरांचा पत्रा उचकटून नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत पाच कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली.

त्यात सतीश सुभाना सकटे यांच्या घराचे जवळपास एक लाख, हिराबाई बाळासो काळे यांच्या घराचे 90 हजार, नारायण नामदेव काळे यांच्या घराचे ए्क लाख 25 हजार, अनिल अरुण खिलारे यांच्या घराचे एक हजार तर शंकर मोतीराम सावंत यांच्या घराचे 30 हजरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकल्पाची धुरांडी झोपडपट्टीवरून जाणाऱ्या वीज वाहक तारावर प्रथम कोसळली. त्यामुळे अन्य घरे वाचली. मात्र धुरांडी कोसळल्याने रात्रीच्या सुमारास वीज पुरवठाही खंडीत झाला होता.

FDA चे अधिकारी म्हणतात "आम्हाला काय एवढीच कामे आहेत का?

कोरोनाविरुध्दच्या लढाईत प्रशासनाला सहकार्य करा; पालकमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

loading image