
Minister Jaykumar Gore mediating between the Ramoshi community and the Chief Minister to resolve the hunger strike peacefully.
Sakal
-रुपेश कदम
दहिवडी : "रामोशी समाज बांधवांच्या मागण्यांविषयी सरकार सकारात्मक असून त्या संविधानाच्या चौकटीत बसवून सोडवाव्या लागतील. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच मार्ग काढू.” असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्यानंतर रामोशी समाजाचे साखळी उपोषण आज मागे घेण्यात आले.