

Panchgani Drug Racket Exposed; 10 Tourists in Police Custody
Sakal
भिलार: महाराष्ट्राचे नंदनवन आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक स्थळ असा लौकिक असलेल्या पाचगणीत आज तब्बल पाच लाख रुपये किमतीचे कोकेन पोलिसांनी जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली. मुंबईहून दोन आलिशान मोटारीतून आलेल्या दहा संशयितांना सातारा आणि पाचगणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांच्याकडे कोकेन आढळल्यावर दोन वाहनांसह एकूण ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.