RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी साताऱ्यात पालकांचा थंडा प्रतिसाद; आत्तापर्यंत २६० प्रवेश निश्चीत

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी शाळा स्तरावर नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे.
RTE admission
RTE admissionsakal

कऱ्हाड - आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी शाळा स्तरावर नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र त्याला थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात आहे. यापुर्वी सातारा जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने अर्ज येते होते. मात्र यंदा शासनाने सरकारी शाळांचाही यात समावेश केला आहे.

जिल्ह्यात तीन हजार २५ खासगी, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठी २४ हजार ९५९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र आजअखेर १९८४ जणांनी ऑनलाईन अर्ज भरले असुन त्यातील १७२४ जणांच्या अर्जात त्रुटी आहेत तर अवघ्या २६० जणांचे अर्ज परिपुर्ण असुन त्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरुन दिसुन येत आहे.

आरटीई म्हणजे काय?

केंद्र सरकारने 2009 साली राईट टू एज्यूकेशन म्हणजेच आरटीई कायदा पारित केला आहे. संविधानातील कमल २९ आणि ३० च्या तरतुदींना अधीन राहून हा अधिनियम 'बालकांना' लागू करण्यात आला. बालक म्हणजे आठ ते १४ वयोगटातील मुलं, अशी व्याख्या यामध्ये करण्यात आली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशाच्या संख्येतील २५ टक्के संख्या ही आरटीई अंतर्गत राखीव ठेवली जाते. तेथे समाजातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करुन प्रवेश मिळवता येतो. त्यातुन प्रवेश मिळाल्यास शिक्षण हे मोफत दिले जाते.

अशी होणार प्रवेशासाठीची कार्यवाही

आरटीई प्रवेशासाठी पालकांचा मोठा कल हा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असतो. मात्र या वेळी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचाही आरटीई प्रवेश प्रक्रियेत समावेश झाला आहे. त्यामुळे असंख्य पालकांना जवळच्या भागात आपल्याला इंग्रजीच्या खासगी शाळा आणि त्यांची नावे ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहेत. यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यात तब्बल नऊ लाख ७६ हजार जागा उपलब्ध आहेत. तर जिल्ह्यात २४ हजार ९५९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.

सरकारी शाळेत प्रवेशासाठी हट्ट कशाला ?

आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने पालक आरटीईतून प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करतात. मात्र पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरत असताना केवळ सरकारी व अनुदानित शाळांची यादी समोर येत आहे. त्यामुळे पालकांची घोर निराशा झाली आहे. सरकारी शाळेत प्रवेश घ्यायचा मग आरटीईचा अर्ज कशाला करायचा? अर्ज न भरता सुद्धा शाळेत थेट प्रवेश मिळतोच ना? मग एवढा खटाटोप कशासाठी ? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

३० एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया

आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जाणार असून त्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू असून ती ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे.

जिल्ह्यातील प्रवेशाची आकडेवारी अशी

तालुका - अर्ज भरलेल्यांची संख्या - अर्ज निश्चीत न झालले - अर्ज प्रवेश निश्चीत झालेली संख्या

जावळी - १२ - १२ - ०

कऱ्हाड - ३८४ - ३४२ - ४२

कोरेगाव - ८१ - ७० - ११

खटाव - ५९ - ४० - १९

खंडाळा - १९० - १३३ - ५७

महाबळेश्वर - ३६ - ३५ - १

माण - ४२ - ३८ - ४

पाटण - २० - २० - ०

फलटण - १३५ - १२० - १५

सातारा - ५०७ - ४०३ - १०४

वाई - १०४ - ९७ - ७

एकुण - १९८४ - १७२४ - २६०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com