esakal | सातारकरांना खुशखबर! व्यायामशाळा, खासगी इन्स्टिट्यूटला परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

सातारकरांना खुशखबर! व्यायामशाळा, खासगी इन्स्टिट्यूटला परवानगी

जिल्हाधिकाऱ्यांनी व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कोविडसदृश्‍य लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, दोन बॅचमध्ये अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे, प्रत्येक बॅचच्यावेळी वस्तू सॅनिटाईज कराव्यात, उपस्थित विद्यार्थ्यांची दररोजची माहिती नोंदवहीत नोंदवावी. कसूर करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई होईल. दंड आकारूनही उल्लंघन केल्यास संबंधित संस्था बंद करण्याची कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

सातारकरांना खुशखबर! व्यायामशाळा, खासगी इन्स्टिट्यूटला परवानगी

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता उर्वरित ठिकाणच्या व्यायामशाळा तसेच कॉम्युटर, टायपिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यास काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज (ता. २९) हा आदेश काढला आहे. 

लॉकडाउन शिथिल करताना काही बाबींना अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही. पण, व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता इतरत्रच्या व्यायामशाळा सुरू करता येतील. व्यायाम करताना कमीत-कमी सहा फुटाचे अंतर राखणे आवश्‍यक आहे. व्यायामशाळेच्या परिसरात चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक असेल. व्यायाम करताना सर्जिकल मास्क अथवा मल्टी लेअर असलेल्या कापडी मास्कचा वापर करावा. साबणाने हात धुणे शक्‍य नसेल तेथे हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करावा, खोकताना व शिंकताना तोंडाला रूमाल अथवा टिशू पेपरचा वार करावा.

सातारा तहसील कार्यालयात विनापावती वसुली; नागरिकांची लूट 

वापरलेल्या टिशू पेपरची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी. व्यायामशाळेत येणाऱ्या प्रत्येकाची स्वत:च्या आरोग्याचे निरीक्षण करणे आवश्‍यक असून आजारी असल्यास तात्काळ स्थानिक आरोग्य विभागास कळविणे बंधनकारक आहे. व्यायामशाळेत सामाजिक अंतराच्या अटीचे पालन करावे, व्यायामशाळेचे शुल्क भरताना ऑनलाईन शुल्काचा वापर करावा, खोल्यांचे दररोज निर्जंतूकीकरण करावे आदी अटी घालण्यात आल्या आहेत. 65 वर्षांवरील नागरीक, गर्भवती महिला व दहा वर्षांच्या आतील मुलांना व्यायामशाळेत व्यायामासाठी परवानगी नाही. 

दिवाळी गोड! न्यू फलटण देणार शेतकऱ्यांना पैसे; सभापती रामराजेंची ग्वाही

कॉम्युटर व टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्कॅनिंग, सामाजिक अंतराची अट पाळणे बंधनकारक असेल. कोविडसदृश्‍य लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, दोन बॅचमध्ये अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे, प्रत्येक बॅचच्यावेळी वस्तू सॅनिटाईज कराव्यात, उपस्थित विद्यार्थ्यांची दररोजची माहिती नोंदवहीत नोंदवावी. कसूर करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई होईल. सामाजिक अंतराची अट पाळली नाही तर तहसिलदरांकडून दह हजार रुपये दंड केला जाईल, दंड आकारूनही उल्लंघन केल्यास संबंधित संस्था बंद करण्याची कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top