
पालिकानिहाय निश्चित केलेल्या स्मशानभूमीतच अंत्यविधी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोविड मृतांवर पालिका हद्दीतच अंत्यसंस्कार : जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा : कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यावर त्यावर अंत्यसंस्कार करण्याची पूर्णपणे जबाबदारी ज्या त्या पालिकेची राहील. तालुक्याच्या कोरोना सेंटरमध्ये मृत्यू झाल्यास ते सेंटर ज्या पालिकेच्या हद्दीत असेल त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार करायचे आहेत. बाधित व्यक्तीचा घरातच मृत्यू झाल्यास घरापासून शववाहिनीने ग्रामीण रुग्णालयात आणण्याची जबाबदारी संबंधित पालिकेच्या कर्मचाऱ्याची असून, मृतदेहाला विहित कार्यपद्धतीनुसार गुंडाळून शववाहिकेत ठेवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची असेल, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, तसेच अनेकदा स्मशानभूमीत जागाच उपलब्ध नसल्याचे मृतदेहाची हेळसांड होऊन नातेवाइकांच्या रोषाला अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. हे ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या मृतदेहाचे शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
लायन्स क्लब सातारा एमआयडीसीचे 12 ऑक्सिजन मशीन कार्यरत
त्यासाठी नगरपालिका व नगरपंचायत यांनी त्यांच्या हद्दीतील कोरोना हॉस्पिटल अथवा कोरोना केअर सेंटरमध्ये मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पडायची आहे. तालुक्याच्या ठिकाणीच्या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास ते सेंटर ज्या पालिका वा नगरपंचायतीच्या हद्दीत असेल त्या ठिकाणच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावेत. एखाद्या कोरोनाबाधित नागरिकाचा मृत्यू घरात झाल्यास त्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या घरापासून शववाहिनीने ग्रामीण रुग्णालयात आणण्याची जबाबदारी संबंधित पालिकेच्या कर्मचाऱ्याची आहे. मृतदेहाला विहित कार्यपद्धतीनुसार गुंडाळून शववाहिकेत ठेवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची असेल. त्यानंतर शासनाच्या कार्यपद्धतीप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकानिहाय निश्चित केलेल्या स्मशानभूमीतच अंत्यविधी करणे बंधनकारक राहील.
ते ना कोणी नातलग; तरीही त्यांच्या शब्दांनी मिळतोय रूग्णाला धीर
यामध्ये सातारा शहर व तालुक्यातील सर्व गावे : कैलास स्मशानभूमी क्षेत्रमाहुली व गेंडामाळ कब्रस्थान, सातारा. फलटण शहरसह तालुका : कोळकी स्मशानभूमी. वाई शहर व तालुका : रविवार पेठ स्मशानभूमी व वाई शहर कब्रस्थान कमिटी सोनगिरवाडी. खटाव तालुका व वडूज शहर इतर समाज स्मशानभूमी, पाटण तालुका व शहर : जुनी एसटी बस स्थानक स्मशानभूमी, दफनभूमी प्रभाग सहा. जावळी तालुका मेढा शहर : मेढा स्मशानभूमी, कऱ्हाड शहर व तालुका : मंगळवार पेठ वैकुंठधाम स्मशानभूमीलगतचे नदीपात्र, तसेच शनिवार पेठ, शाही वक्फ ट्रस्ट इदगा कऱ्हाड, कोरेगाव व तालुका : कैलाश स्मशानभूमी कोरेगाव.
वाईच्या पूर्व भागात मुसळधार; पिकांचे मोठे नुकसान!
रहिमतपूर शहर व परिसरातील 26 गावे : ब्रह्मपुरी स्मशानभूमी, खंडाळा तालुका व शहर : स्मशानभूमी व दफनभूमी खंडाळा, लोणंद शहर व 23 गावे : खोत मळा स्मशाभूमी लोणंद, महाबळेश्वर : वैकुंठ स्मशानभूमी हिरडा नाका, पाचगणीसह परिसरातील 15 गावे : हिंदू स्मशानभूमी, माण तालुका व दहिवडी : मिळकत क्रमांक 3716 माण नदी पात्राशेजारी, म्हसवड व परिसरातील 42 गावे : म्हसवड.
Edited By : Siddharth Latkar
Web Title: Collector Shekhar Singh Orders Municipal Council Funeral Covid 19 Patient Satara News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..