esakal | एकदम झक्कास! दुर्गम उधावण्यात दातृत्वाच्या हातांनी साकारली 'संगणक दुनिया'
sakal

बोलून बातमी शोधा

Computer Training Center

एकदम झक्कास! दुर्गम उधावण्यात दातृत्वाच्या हातांनी साकारली 'संगणक दुनिया'

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : दुर्गम वाल्मीक पठारावरील वाड्यावस्त्यांत वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळावे म्हणून उधवणे (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ सुसज्ज संगणक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. तेथील कैलास बाळकृष्ण साळुंखे यांच्या प्रयत्नाने अंधेरी-मुंबई येथील मे डॉकेंडल शिप मॅनेजमेंट कंपनी व एसआर सिस्टिम यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेसाठी ग्रामपंचायतीनेही हातभार लावला आहे.

वाल्मीक पठारावरील गावात संगणकीय शिक्षणाची गैरसोय लक्षात घेऊन उधवणेतील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळच्या खोलीत सुसज्ज संगणक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तेथील कैलास बाळकृष्ण साळुंखे यांच्या प्रयत्नाने मे डॉकेंडल शिप मॅनेजमेंट कंपनी व एसआर सिस्टिम यांच्या सहकार्याने दहा संगणक व संलग्न साधने उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधेसाठी ग्रामपंचायतीनेही 14 व्या वित्त आयोग व ग्रामनिधींव्दारे हातभार लावला आहे.

नागरिकांनाे! कुटुंबाच्या सुरक्षेसाठी वेळीच कोरोना चाचणी करा

ग्रामपंचायतीच्या वापरात नसलेल्या मोठ्या खोलीची दुरुस्ती करून हे केंद्र सुरू करण्यात आले असून, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्या हस्ते त्याचे नुकतेच उद्‌घाटन झाले. गटविस्तार अधिकारी संदीप कुंभार, उधवणेचे सरपंच विजय साळुंखे, रुवलेचे सरपंच हणमंत साळुंखे, उपसरपंच रामचंद्र साळुंखे, सदस्या प्रेमा साळुंखे, रूपाली साळुंखे, संगीता शिर्के, दत्तात्रय कारेकर, धोंडिबा साळुंखे, बाबूराव साळुंखे आदी उपस्थित होते. दत्तात्रय तरटे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामसेवक अनिल कांबळे यांनी स्वागत केले. रामचंद्र साळुंखे यांनी आभार मानले.

वाचा शेतक-याची व्यथा; सव्वालाखा ऐवजी 20 हजारच हाती आले

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली सुविधा उपलब्ध केली असून, लॉकडाउननंतर विद्यार्थ्यांच्या बॅचेस करून विविध संगणकीय कोर्स सुरू करण्यात येणार आहेत.

-विजय साळुंखे, सरपंच, उधवणे

Edited By : Balkrishna Madhale

loading image
go to top