esakal | वाचा शेतक-याची व्यथा; सव्वालाखा ऐवजी 20 हजारच हाती आले
sakal

बोलून बातमी शोधा

Papya Garden

वाचा शेतक-याची व्यथा; सव्वालाखा ऐवजी 20 हजारच हाती आले

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. लॉकडाउनने शेतकऱ्याची पपईची बाग गिळंकृत केली. पडलेला भाव, तसेच ग्राहक नसल्याने माणमधील शेतकऱ्याने पपईच्या बागेवर ट्रॅक्‍टर फिरविला.

काळचौंडी (ता. माण) येथील शेतकरी धनंजय भगवान माने- पाटील यांनी आपल्या शेतातील 30 गुंठे क्षेत्रावर सुमारे नऊशे ते साडेनऊशे "तैवान 786' जातीची पपईच्या झाडांची 11 महिन्यांपूर्वी लागवड केली होती. अतिशय कष्टाने त्यांनी बाग जोमात आणली होती. झाडांना चांगली फळेसुद्धा आली होती. या फळांची मागील तीन महिन्यांपासून तोडणी सुरू झाली होती. पुणे येथील बाजार समिती ही फळे पाठवली जात होती; पण दर मात्र मनासारखा मिळत नव्हता. 5 ते 6 रुपये मिळत असल्याने हाती काहीच उरत नव्हते. दराबरोबरच लॉकडाउनची भर पडली.

कोरोनाग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी कदम आले धावून

कोरोनाच्या सावटाखाली लॉकडाउनमुळे बाजार समित्या बंद असल्याने पपई कुठे पाठवायची हा प्रश्न माने यांच्यासमोर होता. बाजार समिती बंद, तसेच दरसुद्धा नाही, यामुळे आलेल्या नैराश्‍यातून त्यांनी पपईच्या बागेवर ट्रॅक्‍टर फिरवून संपूर्ण बाग नष्ट केली. पपईच्या बागेला एकूण खर्च साधारण 50 हजार रुपये आला. सव्वालाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु फक्त 20 हजारच उत्पन्न हाती आले.

संकट काळातून बाहेर पडण्यासाठी कऱ्हाडातील 300 युवकांचे याेगदान

माणमधील शेतकरी अस्मानी संकटांना तोंड देत शेती पिकविण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, अस्मानीसोबतच कोरोनाच्या सुलतानी संकटाने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवले आहे.

- धनंजय माने- पाटील, शेतकरी

मोहिते-पाटलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ; युवतीने धुडकावली Offer

loading image