esakal | कार्यकर्त्याच्या हाकेनंतर नेत्याने पाेचविले रेमडेसिव्हर

बोलून बातमी शोधा

Manohar Shinde Remdesivir

ग्रामीण भागात बेड , व्हेटिंलेटर , आॅक्सिजन या सारख्या गाेष्टींची उपलब्धतेत अडचणी जाणवत आहेत.

कार्यकर्त्याच्या हाकेनंतर नेत्याने पाेचविले रेमडेसिव्हर

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : काेविड 19 ची रुग्ण संख्या देशासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. सातारा जिल्ह्यात दरराेज एक हजारपेक्षा अधिक नागरिकांना काेविड 19 ची बाधा हाेत आहे. यामध्ये ज्यांचे वय 60 पेक्षा जादा आहे अशांचा मृत्यू हाेत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबराेबरच ग्रामीण भागात बेड , व्हेटिंलेटर , आॅक्सिजन या सारख्या गाेष्टींची उपलब्धतेत अडचणी जाणवत आहेत.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणा-यांपैकी काही रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज भासत आहे. हे इंजेक्शन रुग्णांना मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने एफडीएच्या माध्यमातून व्यवस्था केली आहे. परंतु मागणीपेक्षा पूरवठा कमी असल्याने इंजेक्शन सर्वांनाच मिळतेय असेही नाही. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक जिल्ह्यापासून राज्यात अगदी देशपातळीवरील परिचितांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन कूठे उपलब्ध हाेईल का पहा अशी विनवणी करीत आहे.

अनेक नागरिक आपल्या नेत्यांकडे देखील रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबत चाैकशी करीत असतात. त्यांच्या माध्यमातून मिळेल अशी त्यांची भावना असते. मित्रांकडून, नातेवाईकांकडून रेमडेसिव्हर मिळाल्यानंतर त्यांचे आभार मानावे तेवढे थाेडेच अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. या परिस्थितीत देखील लाेक एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत.

मोहिते-पाटलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ; युवतीने धुडकावली Offer

सातारा जिल्ह्यातील लाेणंद या गावात एक रुग्णास रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता हाेती. संबंधित रुग्णासाठी स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि मलकापूरचे (क-हाड) उपाध्यक्ष मनाेहर शिंदे यांना संपर्क साधून रुग्णाची परिस्थिती सांगितली. त्यानंतर शिंदे यांनी स्वतः खंडाळा येथे जाऊन संबंधितास रेमडेसिव्हीर दिले. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. श्री. शिंदे यांच्या कार्यत्तपरतेची सर्वच जण काैतुक करीत आहेत.

समाज माध्यमांवर देखील शिंदेंनी केलेल्या कामाचा ठसा उमटू लागला आहे. भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पार्टी खंडाळा तालुका या फेसबुक पेजवर शिंदेंनी रेमडेसिव्हीर उपलब्ध केल्याने त्यांचे शतशः आभार मानले आहेत. कार्यकर्त्यांवर असणारे नेत्यांचे प्रेम किती माेठे असू शकते हे शिंदेंच्या कृतीतून दिसून येत आहे.