

Zilla Parishad Coordination Issues Deepen as Key Appointments Remain Unfilled
sakal
-प्रशांत घाडगे
सातारा : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊन दोन महिने उलटले, तरी अध्यक्षांचे एक व चार सभापतींच्या स्वीय सहाय्यकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी, पदाधिकाऱ्यांच्या भेटी, पत्रव्यवहार व बैठकींच्या नियोजनाचा काहीअंशी अभाव असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांमधील दैनंदिन कामात समन्वय राहण्यासाठी लवकरात- लवकर नियुक्त्या होणे अपेक्षित आहे.