
-पांडुरंग बर्गे/ भाऊसाहेब जंगम
कोरेगाव/हुमगाव : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्याप्रमाणे सधन व सक्षम महिला लाभार्थींची घुसखोरी झाली. तशीच आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेमध्ये बांधकाम क्षेत्राशी दुरान्वयानेही संबंध नसलेले वा कधी येणार नाही, अशा बोगस हजारो पुरुष आणि महिलांनी घुसखोरी केली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे ही योजना मिळवून देतो, म्हणून तब्बल ५०० ते दहा हजार रुपये उकळणाऱ्या दलालांची साखळी निर्माण झालेली असून, त्यांना मंडळातील काही कर्मचाऱ्यांचीही साथ असल्याचे बोलले जात आहे.