काेविड 19 Report निगेटिव्ह असेल तरच उद्यापासून दुकाने उघडा

पाचगणी पालिकेचा व्यावसायिकांना इशारा
Covid 19 Test
Covid 19 TestCovid 19 Test

भिलार (जि. सातारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाजीपाला, फळे, दूध, चिकन-मटण आणि किराणा दुकानदाराने कोविड-19 टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड तपासणीचे अथवा कोविड लसीचे प्रमाणपत्र असेल त्यालाच दुकान उघडण्याची परवानगी राहणार आहे.

त्यामुळे पाचगणी आरोग्य केंद्रात कोरोना टेस्ट करून घेण्यास व्यापाऱ्यांनी एकच गर्दी होत आहे. काही 45 वर्षांवरील व्यापाऱ्यांनी कोरोना लस घेतल्याने त्यांना दुकानात बसण्यास काहीही हरकत नसली तरी दुकानात बसणारे मालक व कामगारांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन पालिकेने केली आहे. परिणामी व्यापारी सकाळपासूनच हडबडून जागे झाले. टेस्ट केली असेल त्यांनीच दुकाने उघडवीत, असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगताच व्यापाऱ्यांची टेस्टसाठी आरोग्य केंद्रात गर्दी झाली होती.

ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना टेस्ट केलेले निगेटिव्हचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येईल. शहरातील भाजीपाला, फळविक्रेते, दूध विक्रेते, चिकन- मटण, किराणा दुकानदारांना पहिल्या टप्प्यात प्रमाणपत्र मिळविणे अत्यंत आवश्‍यक आहे. ज्या व्यापाऱ्याकडे प्रमाणपत्र नाही त्याने दुकान उघडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करण्यात येणार आहे.

कोरोना लस सहज उपलब्ध व्हावी यासाठी पालिका नगरपालिका शाळेत स्वतंत्र विभाग करून त्या ठिकाणी लस देण्याची व्यवस्था करणार असून लवकरच ही सोय नागरिकांसाठी खुली होईल, अशी माहिती पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com