esakal | सातारा जिल्ह्यात 1540 रुग्णांना डिस्चार्ज; 33 बाधितांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Coronavirus Update
सातारा जिल्ह्यात 1540 रुग्णांना डिस्चार्ज; 33 बाधितांचा मृत्यू
sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या आकडा झपाट्याने वाढत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचेही प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात आज एक हजार 666 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 33 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तसेच एक हजार 540 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या टप्यातील मृत्यूचे सत्र अजूनही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत होता. ऑक्‍टोबरनंतर कोरोनाने मृत्यू व बाधितांची संख्या आटोक्‍यात आली होती. मात्र, जानेवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मृत्यूंचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, मागील महिनाभरात बाधित व मृत्यूंच्या संख्येने कहर केला आहे, तसेच अद्यापही मृत्यू सत्राची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज जिल्ह्यात सातारा तालुक्‍यात सर्वाधिक 367 बाधित, तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला. कऱ्हाड तालुक्‍यात 258 बाधित रुग्ण, तर 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

कार्यकर्त्याच्या हाकेनंतर नेत्याने पाेचविले रेमडेसिव्हर

जिल्ह्याला 808 रेमडेसिव्हिर

जिल्ह्याला मंगळवारी 808 रेमडेसिव्हिर मिळाले असून, 70 रुग्णालयांना वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक 69 रेमडेसिव्हिर कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयाला मिळाले आहेत. रेमडेसिव्हिर उपलब्धतेचे प्रमाण वाढल्याने आयसीयू व ऑक्‍सिजन बेडच्या 40 टक्के प्रमाणात वाटप करण्यात आले आहे.

एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं..