esakal | Diwali Festival 2020 : साता-यात फटाकेच मिळेनात; उलाढाल जेमतेम
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival 2020 : साता-यात फटाकेच मिळेनात; उलाढाल जेमतेम

यंदा माल कमी होत आणि त्या तुलनेत मागणी वाढल्याने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करताना आमची दमछाक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत उलाढाल कमी असली, तरी सर्व फटाके संपले आहेत अशी माहिती संघटनेच्यावतीने दीपक शिंदे यांनी दिली.

Diwali Festival 2020 : साता-यात फटाकेच मिळेनात; उलाढाल जेमतेम

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : लॉकडाउनमुळे मजुरांअभावी शिवकाशी येथे यंदा नेहमीच्या तुलनेत फटाक्‍यांचे उत्पादन झाले नाही. याठिकाणचे उत्पादन मंदावल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर झाला. यामुळे येथील बाजारपेठेत फटाक्‍यांची आवक कमी झाली होती. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करताना फटाका व्यावसायिकांची दमछाक झाली.
 
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाउनचा फटका सर्वच उद्योग व्यवसायांना बसला. यातून शिवकाशी येथील फटाका उत्पादकसुद्धा सुटले नाहीत. लॉकडाउननंतर त्या भागातील मजुरांनी स्थलांतर केल्याने त्याठिकाणच्या उत्पादनावर परिणाम झाला. दिवाळी तोंडावर असताना मजूर उपलब्ध होत नसल्याने शिवकाशी येथील अनेक फटाका कारखान्यातील उत्पादन निम्म्यापेक्षा कमीवर आले होते. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा येथील फटाका विक्रेत्यांनी आपल्या मालाची नोंदणी फटाका उत्पादकांकडे नोंदविली होती. मात्र, त्यांना गरजेइतका माल मिळणार नसल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात आले. मिळेल तेवढे फटाके ताब्यात घेत येथील व्यावसायिकांनी दिवाळीच्या हंगाम "कॅश' करण्याची तयारी सुरू केली होती. याच कालावधीत केंद्र व राज्य शासनाने फटाक्‍यांबाबतची एक नियमावली जाहीर केली.

निकृष्ट कठड्यांमुळेच पाच जणांचा मृत्यू; राष्ट्रीय महामार्गावरील दर्जाहीन कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह! 

या नियमावलीचा आधार घेत येथील फटाका विक्रेत्यांना परवानग्या नाकारण्यात येऊ लागल्या. विक्री परवानगी मिळत नसल्याने फटाके व्यावसायिक हवालदिल झाले होते. परवानगी मिळाली नाही तर आणलेल्या फटाक्‍यांचे करायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. राज्य शासनाने नंतरच्या काळात फटाक्‍यांबाबतची सुधारित नियमावली जाहीर केली व विक्री परवानगीचा विषय मार्गी लागला. यानंतर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर फटाके स्टॉल उभे राहिले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्टॉलची संख्या अत्यंत कमी होती. 

उलाढाल कमी झाली तरी फटाके संपले 

याबाबत माहिती देताना फटाका स्टॉल असोसिएशनचे दीपक शिंदे म्हणाले, ""शासनाने परवानगी देण्यास विलंब केल्याने अनेक नागरिकांच्या मनात फटाके उडविण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यात शिवकाशी येथील उत्पादन मंदावले होते. त्याठिकाणाहून अत्यंत कमी फटाके मिळाल्याने आहे ते फटाके विकण्याशिवाय विक्रेत्यांकडे पर्यायच नव्हता. यंदा माल कमी होत आणि त्या तुलनेत मागणी वाढल्याने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करताना आमची दमछाक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत उलाढाल कमी असली, तरी सर्व फटाके संपले.''

त्रिशंकू भागात नागरी सुविधांचा अभाव; विकासकामांसाठी नगराध्यक्षांना साकडे

Edited By : Siddharth Latkar