
ढेबेवाडी : तब्बल सात वर्षांपासून अडवलेली पुनर्वसनाची देय रक्कम तातडीने बँक खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी मराठवाडी (ता. पाटण) येथील धरणग्रस्त सुभद्रा सहदेव शिंदे- मराठे (वय ८०) यांनी आजपासून मराठवाडी धरणाच्या काठावर भर पावसात उपोषण सुरू केले. दरम्यान, याप्रकरणी आदेश झाला असला, तरी ६० दिवसांचा अपील कालावधी असल्याने त्यावर कार्यवाही करता येत नसल्याने उपोषणापासून परावृत्त व्हावे, अशी प्रशासनाने पत्राद्वारे केलेली विनंती अमान्य करत नेमकी कोणत्या तारखेला देय रक्कम जमा करणार? हे लेखी दिल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.