कास पठाराला मुसळधार पावसाचा तडाखा; विद्युततारांसह खांबांचं नुकसान

Kas Pathar Area
Kas Pathar Areaesakal

कास (सातारा) : कास पठार परिसरातील अतिदुर्गम व डोंगरमाथ्यावरील कुसुंबीमुरा (ता. जावळी) येथील आखाडेमुऱ्यावर मागील वळीव व चक्रीवादळाचा (Cyclone) तडाखा बसून झालेल्या वादळी मुसळधार पावसाने (Heavy Rain) वीज वाहून नेणाऱ्या विद्युत तारा (Electrical Wire) या उभे राहिल्यानंतर हात लागेल एवढ्या अंतरावर खाली येऊन धोकादायक स्थितीत आहेत. एखादा अनुचित प्रकार घडण्याआधीच तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (Damage To Power Lines In The Kas Pathar Area Due To Cyclone And Rain Satara Marathi News)

Summary

शहराच्या पश्चिमेस गेल्या महिनाभरात वळीव व तौत्‍के चक्रीवादळाचा तडाखा बसून झालेल्या वादळी मुसळधार वाऱ्याने काही ठिकाणी विजेचे खांब वाकून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

शहराच्या पश्चिमेस गेल्या महिनाभरात वळीव व तौत्‍के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखा बसून झालेल्या वादळी मुसळधार वाऱ्याने काही ठिकाणी विजेचे खांब वाकून तसेच झाडे उन्मळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कुसुंबीमुरा येथील आखाडेमुऱ्यावर या वादळी पावसाचा जोरदार फटका बसून साधारण सात ते आठ वीजवाहक खांब वाकले आहेत. वीज वाहून नेणाऱ्या विद्युत तारेचा ताण कमी होऊन खाली आल्या होत्या.

Kas Pathar Area
सातारा जिल्ह्यात पावसाची रिमझिम; काेयनेसह महाबळेश्वरात जाेर

दरम्यान, विद्युत खांब वाकल्याने खांबावर चढता येत नसल्याने वायरमनने एकमेकांत गुंतलेल्या तारा बांबूच्या साहाय्याने वेगळ्या करून त्याला आधार देत विजेचा पुरवठा सुरू केला होता. त्यानंतर पुन्हा मान्सूनपूर्व पावसामुळे या विद्युततारा हाताच्या अंतरावर खाली आल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी असते. खाली आलेल्या विद्युततारेखालून जनावरे, ग्रामस्थांची सतत ये-जा सुरू असते. सततच्या वाऱ्यामुळे ताण कमी होऊन हात लागेल एवढ्या अंतरावर विद्युततारा आल्यामुळे विजेचा धक्का बसून एखादी विपरित घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याने तत्काळ या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Kas Pathar Area
आपत्तीत हलगर्जीपणा चालणार नाही; गृहराज्यमंत्र्यांचे सक्त आदेश

महावितरणच्या मेढा कार्यालयातील अधिकाऱ्यांशी या घटनेची प्रत्यक्ष तसेच फोनवरून संपर्क करून मागील काही दिवसांपूर्वी तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. एखादी अनुचित घटना घडण्याआधीच तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

-ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, आखाडेमुरा

Damage To Power Lines In The Kas Pathar Area Due To Cyclone And Rain Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com