esakal | पिंपळाच्या पानांवर अनोखी कलाकारी; लॉकडाउनमध्ये साकारली चित्रमय दुनिया
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळाच्या पानांवर अनोखी कलाकारी; लॉकडाउनमध्ये साकारली चित्रमय दुनिया

नजीकच्या काळात शाळा-महाविद्यालये, सेवाभावी संस्था, व्यक्ती व मंडळांच्या माध्यमातून या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करून विद्यार्थी व नवोदित चित्रकारांना त्यातून प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचा त्यांचा संकल्प आहे.

पिंपळाच्या पानांवर अनोखी कलाकारी; लॉकडाउनमध्ये साकारली चित्रमय दुनिया

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा): कुठरे (ता. पाटण) येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक दामोदर दीक्षित (Art teacher Damodar Dixit) यांनी लॉकडाउनमधील (lockdown) मोकळ्या वेळेत पिंपळाच्या पानांवर व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची आकर्षक व हुबेहूब चित्रे साकारली आहेत. नजीकच्या काळात शाळा-महाविद्यालये, सेवाभावी संस्था, व्यक्ती व मंडळांच्या माध्यमातून या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करून विद्यार्थी व नवोदित चित्रकारांना त्यातून प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचा त्यांचा संकल्प आहे.

हेही वाचा: साताऱ्यासह कऱ्हाडात धुवांधार; ढेबेवाडी खोऱ्यातील महिंद धरण 'ओव्हरफ्लो'

रयत शिक्षण संस्थेच्या कुठरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये श्री. दीक्षित शिकले आणि तेथेच कलाशिक्षक म्हणून ३५ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्तही झाले. बोलक्या भिंतीबरोबरच चित्रकलाविषयक विविध उपक्रमांव्दारे त्यांनी या विद्यालयाचा चेहरा-मोहराच बदलला आहे. श्री. दीक्षित यांनी स्वतःच्या घरात कलादालन तयार केले असून, ऑइल, वॉटर व अक्रेलिक रंगात स्वतः साकारलेली विविध विषयांवरील असंख्य चित्रे त्यांनी तेथे जतन करून ठेवलेली आहेत.

हेही वाचा: 'आला रुग्ण की पाठवा कऱ्हाडला'; ढेबेवाडी 'आरोग्य'त 14 वर्षांनंतरही सुविधांची वानवाच!

आता त्यामध्ये पिंपळाच्या पानांवर काढलेल्या चित्रांची भर पडली आहे. लॉकडाउनच्या काळात घरातच अडकून पडल्यानंतर अशा प्रकारे चित्रे साकारण्याची कल्पना सुचल्यावर त्यांनी परिसरात मोठ्या पानांच्या पिंपळाच्या झाडांचा शोध घेऊन गोळा केलेली पाने पुस्तकात ठेऊन व्यवस्थित सुकवली. त्यानंतर अॅक्रेलिक कलर वापरून व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची आकर्षक व हुबेहूब चित्रे साकारली. अगदी जिवंत वाटावी अशी ही चित्रे बघायला विद्यार्थी व कलाप्रेमी नागरिक श्री. दीक्षित यांच्या घरी आवर्जून भेट देत आहेत.

हेही वाचा: कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील विंगमध्ये तब्बल पंधरा वर्षांनंतर धावली 'लालपरी'

'लॉकडाउनच्या काळात वेळच-वेळ जवळ होता. वेगळ्या पद्धतीने चित्रकलेचा छंद जोपासत तो सत्कारणी लावला. जीव ओतून पिंपळाच्या पानांवर साकारलेली ही चित्रमय दुनिया माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे.'

-दामोदर दीक्षित, सेवानिवृत्त कलाशिक्षक

loading image
go to top