काँग्रेसचा 'करेक्ट' कार्यक्रम केल्यानंतर भाजप नेते सहकारमंत्र्यांच्या भेटीला I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

बॅंकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सहकारमंत्री पाटील आणि भोसले गट एकत्र आले आहेत.

काँग्रेसचा 'करेक्ट' कार्यक्रम; भाजप नेते सहकारमंत्र्यांच्या भेटीला

कऱ्हाड (सातारा) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये (Satara District Bank Election) कऱ्हाड सोसायटी गटातून सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी विजय मिळवला. त्याबद्दल कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले (Atul Bhosle) यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सहकारमंत्री पाटील आणि भोसले गट एकत्र आले आहेत. त्यांनी नवी मोट बांधून जिल्हा बॅंकेत विजय मिळवला आहे. विजय जाहीर झाल्यानंतर सहकारमंत्री पाटील यांनी थेट कृष्णा हॉस्पिटल परिसरात जाऊन भोसले गटाचे नेते डॉ. सुरेश भोसले यांची भेट घेतली होती. त्या वेळी अतुल भोसले हे उपस्थित नव्हते. त्यामुळे काही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आज अतुल भोसले यांनी सहकारमंत्री पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे चर्चांना लगाम बसला आहे. ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा: 'शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे नेतेही माझ्या पराभवाला जबाबदार'

राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील प्रतिष्ठेच्या लढतीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवून माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांचा 8 मतांनी पराभव केला. एका-एका मताची बेरीज करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकारमंत्र्यांनी भाजपच्या भोसले गटाला जवळ करुन शिष्टाईतून लढवलेल्या या निवडणुकीत परफेक्ट नियोजन करुन उंडाळकरांचा करेक्ट कार्यक्रम केला. या विजयामुळे सहकारमंत्र्यांचा अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्हा बॅंकेत पुढच्या दाराने प्रवेश नक्की झाला आहे. दरम्यान, हा निकाल कऱ्हाड तालुक्यातील बदलणाऱ्या राजकीय समीकरणांची नांदीच ठरला आहे.

हेही वाचा: NCP उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपाध्यक्षांचा राजीनामा

loading image
go to top