'राष्ट्रवादी सहकार पॅनेलच्या काही उमेदवारांना हार पत्करावी लागली; पण..'

Nitin Patil
Nitin Patilesakal
Summary

'तो' कारखाना सुरू करण्याबाबत अध्यक्ष मदन भोसले यांनी केलेली मागणी म्हणजे, 'लबाडी' होती.

पसरणी (सातारा) : सत्ता असताना कै. लक्ष्मणराव पाटील (Laxmanrao Patil) यांनी सवंग लोकप्रियतेसाठी कारखान्याचा कधीच वापर केला नाही. सहकार चुकीच्या माणसाच्या हातात दिल्यावर काय होतं, याचं किसन वीर साखर कारखाना (Kisan Veer Sugar Factory) हे उत्तम उदाहरण आहे, असं स्पष्ट मत सातारा जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी व्यक्त केले. प्रशासनाच्या घडीप्रमाणे जिल्हा बँकेचे (Satara District Bank Election) कामकाज चालेल, असेही त्यांनी नमूद केलं.

ओझर्डे (ता. वाई) येथे सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडीबद्दल नितीन पाटील (Nitin Patil) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य मधुकर भोसले, ॲड. उदयसिंह पिसाळ, नितीन भोसले, रामदास इथापे, अमोल कदम, विक्रम पिसाळ, विजयसिंह पिसाळ उपस्थित होते. ते म्हणाले, ''जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शांततेत व एकमताने होईल. सहकार पॅनेलच्या काही उमेदवारांना अनपेक्षितरित्या हार पत्करावी लागली. परंतु, किसन वीर, विलासराव उंडाळकर, अभयसिंहराजे यांनी घालून दिलेल्या प्रशासनाच्या घडीप्रमाणे बँकेचे कामकाज चालते. यापुढेही ती परंपरा बँक राखेल.''

Nitin Patil
'10 वर्षात काँग्रेसचा 90 टक्क्यांहून अधिक निवडणुकांत पराभव'

आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांच्यावर विश्वास असल्याने खंडाळा तालुक्यातील जनतेने साखर कारखान्याची धुरा त्यांच्यावर सोपवली. तो कारखाना सुरू करण्याबाबत अध्यक्ष मदन भोसले (Madan Bhosle) यांनी केलेली मागणी म्हणजे लबाडी होती. पुढच्या गळीत हंगामापर्यंत हा कारखाना सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे म्हणाले, ''जिल्हा बँकेत नितीन पाटील यांना विश्वासाने हॅट्रिक करण्याची संधी जनतेने दिलीय, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Nitin Patil
Political News : नगरपंचायतीवर भाजपाची सत्ता येणार'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com