
पावडरचा उग्र वास घरात येत असल्यानं या उग्र वासामुळंच श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला.
Karad Police : हृदयद्रावक घटना! धान्यातील पावडरीच्या वासानं चिमुरड्या बहीण-भावाचा दुर्दैवी अंत
कराड : सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील (Karad Taluka) मुंढे इथं चिमुकल्या सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. श्लोक अरविंद माळी (वय 3 वर्षे) व तनिष्क अरविंद माळी (वय 7) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत.
दरम्यान, धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासानं चिमुकल्या दोघांनाही त्रास झाल्याचं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धान्याची साठवणूक करण्यासाठी घरात पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत असल्यानं या उग्र वासामुळंच श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला, त्यामुळं चिमुकल्यांना नातेवाईकांनी कराडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

Brother and Sister
मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी श्लोकचा मृत्यू झाला. तर, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याची मोठी सात वर्षांची बहीण तनिष्का हिलाही उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळं तिलाही नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, उपचार सुरू असताना तिचाही मंगळवारी मृत्यू झाला. या घटनेनं मुंढेसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.