esakal | ''ज्या माणसाने स्वतःच्या दोन बॅंका विकल्या, पाच संस्था मोडीत काढल्या 'ते' राष्ट्रवादीत नकोत''
sakal

बोलून बातमी शोधा

''ज्या माणसाने स्वतःच्या दोन बॅंका विकल्या, पाच संस्था मोडीत काढल्या 'ते' राष्ट्रवादीत नकोत''

मी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटत असतो. त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेताना त्यांना भाजपच्या आमदाराला पक्षात प्रवेश द्या, असे कधीही बोललो नाही असे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी नमूद केले.

''ज्या माणसाने स्वतःच्या दोन बॅंका विकल्या, पाच संस्था मोडीत काढल्या 'ते' राष्ट्रवादीत नकोत''

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाची जिल्ह्यात ताकद असताना केवळ जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे शिवेंद्रसिंहराजेंशी (Shivendra Raje Bhosale) जवळीक करून त्यांना पक्षात येण्याचे आवाहन करत आहेत. ज्या माणसाने दोन बॅंका विकल्या. पाच संस्था मोडीत काढल्या, ते जिल्हा बॅंक काय चालविणार, असा प्रश्‍न उपस्थित करून शशिकांत शिंदे यांनी वल्गना थांबवून साताऱ्याच्या जनतेत व पक्षाच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करण्याचे थांबवावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी व्यक्त केली आहे.
 
जिल्हा बॅंक व पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शशिकांत शिंदेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर काही दिवसांपूर्वी दिली होती. यावरून दीपक पवार यांनी पत्रकाद्वारे शशिकांत शिंदे व शिवेंद्रसिंहराजेंवर टीका केली आहे. 
पत्रकात श्री. पवार यांनी म्हटले, की शशिकांत शिंदेंनी खासदार शरद पवार यांचा अवमान करण्याचे थांबवावे. गेली 40 वर्षे अभयसिंहराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शरद पवारांनी सत्तेच्या माध्यमातून राजकारणात संधी दिली. ते पवारसाहेबांच्या आशीर्वादावर 40 वर्षे जिल्ह्यात व राज्यात राजकारण करत आले आहेत; पण भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत येणार नाही, म्हणून विधानसभा निवडणुकीवेळी शिवेंद्रसिंहराजेंनी पवारसाहेबांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पवारसाहेबांची साताऱ्यात भर पावसात सभा झाली. ही सभा देशभर गाजली. या सभेत त्यांनी मागील निवडणुकीत माझी चूक झाली, ती दुरुस्त करावी, असे आवाहन साताऱ्याच्या जनतेला केले.

शशिकांत शिंदे आणि मी एकच : शिवेंद्रसिंहराजे

त्यातून सातारा विधानसभा मतदारसंघातील 76 हजार मतदारांनी मला मतदान केले. केवळ 18 ते 20 हजार मतांचा फरक निवडून येण्यासाठी राहिला होता. 76 हजार मतदारांनी मला मतदान केले. ही सर्व बाजू एकीकडे असताना शशिकांत शिंदे हे शिवेंद्रसिंहराजेंना तुम्ही राष्ट्रवादीत या, नव्या पिढीचे नेतृत्व करा, असे सांगत आहेत. हे सर्व कशासाठी व का चालले आहे, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, ""राष्ट्रवादीची जिल्ह्यात ताकद असताना केवळ जिल्हा बॅंकेसाठी जवळीक करण्याचे कारण काय. ज्या माणसाने स्वतःच्या दोन बॅंका विकल्या. पाच संस्था मोडीत काढल्या. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी वल्गना थांबवाव्यात.'' 
चौकट 

घरगुती निर्णय आहे का ?
 
मी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटत असतो. त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेताना त्यांना भाजपच्या आमदाराला पक्षात प्रवेश द्या, असे कधीही बोललो नाही; पण शशिकांत शिंदे आपण जे बोलतात. तो त्यांचा घरगुती निर्णय आहे का, असा प्रश्न श्री. पवार यांनी उपस्थित केला आहे. माझी आमदार शिंदेंना विनंती आहे, की त्यांनी साताऱ्याच्या जनतेत व पक्षाच्या कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करू नये, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले आहे.

उदयनराजेंसमवेतच्या निर्णयावर शिवेंद्रसिंहराजे ठाम

इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये

पाकिस्तानमधील मराठी बांधव प्रथमच छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास ऐकणार आहेत 

Edited By : Siddharth Latkar