esakal | बाप रे..! भवानवाडीत डेंगीसदृश साथ

बोलून बातमी शोधा

dengi

बाप रे..! भवानवाडीत डेंगीसदृश साथ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंब्रज (जि. सातारा) : भवानवाडी येथे गेल्या चार दिवसांपासून डेंगीसदृश साथीच्या आजारांने नागरिक आजारी आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वैद्यकीय पथकाने गावाची पाहणी करून योग्य उपाययोजना केल्या आहेत.

भवानवाडी येथील नागरिकांना ताप येणे, पाय दुखणे, जुलाब असा त्रास होत आहे. या आजाराने गावातील असंख्य नागरिक त्रस्त आहेत. माहिती मिळताच उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक गावात दाखल झाले. वैद्यकीय पथकाने गावाची पाहणी केली. गावात डेंगीसदृश डासांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले. या वेळी वैद्यकीय पथकाने नागरिकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. आजारी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नाशिक काय घेऊन बसलात, इथं 66 रुग्णांचा जीव धाेक्यात आला हाेता

'रेमडेसिव्हिर' चे राजकारण करू नका : बाळासाहेब पाटील