
सातारा : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र संताप जिल्ह्यात व्यक्त होत आहे. हल्ल्यानंतरच्या तिसऱ्या दिवशीही साताऱ्यासह कऱ्हाड, वडूज, पुसेगाव, लोणंद, मसूर, पाचगणी आदी ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले, तर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी पर्यटकांना श्रद्घांजलीही वाहण्यात आली. साताऱ्यात मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून आपल्या संवेदना व्यक्त केल्या.