esakal | जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; साताऱ्यात सोमवारी होणार 42 शिक्षकांना वितरण
sakal

बोलून बातमी शोधा

satara

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; साताऱ्यात सोमवारी होणार 42 शिक्षकांना वितरण

sakal_logo
By
Team eSakal

सातारा : जिल्हा परिषदेच्या वतीने दर वर्षी देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. गेल्या वर्षीचे १९ आणि यंदाचे २३ असे एकूण ४२ आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत सोमवार (ता. ६) दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात करण्यात येणार आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात येते. गेल्या वर्षी कोरोनामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याचे वितरण करण्यात आले नव्हते.

मात्र, यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने २०२०- २१ व २०२१- २२ या दोन वर्षांचे पुरस्कार वितरण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पुरस्कारात यंदाच्या वर्षी बसप्पाचीवाडी शाळेचे प्रवीण क्षीरसागर, कामेरी शाळेचे धनाजी कातांगळे, मांडवे शाळेचे कुंडलिक जगदाळे, शेरे शाळेचे प्रदीप कुंभार, कवठे शाळेच्या नलिनी बैले, चव्हाणवाडी शाळेचे दादासाहेब गायकवाड, वेखंडवाडी शाळेचे प्रल्हाद पवार, खटकेवस्ती शाळेचे लालासो भोसले, दऱ्याचीवाडी शाळेच्या करुणा मोहिते, कुळकजाई शाळेचे वसंत जगदाळे, वडगाव शाळेचे संजय खरात, रानमळा शाळेच्या वैशाली खाडे, कण्हेरखेड शाळेचे अकबर मुलाणी, जवळवाडी शाळेचे शांताराम ओंबळे, गवडी शाळेच्या मंगल पिसाळ, भिलार शाळेचे विजय भोसले, शिंदेवाडी शाळेच्या प्रतिभा सूर्यकांत भांडे-पाटील, मळाईवस्ती शाळेच्या भारती रामगुडे, वेटणे शाळेचे अजित चव्हाण, साळुंखेमळा शाळेचे हसन शेख, मांडवे शाळेचे जयकर खाडे, वेळे शाळेच्या संजीवनी बुलंगे, शेंदूरजणे शाळेच्या राजश्री पोतदार यांना जाहीर झाले आहेत.

याचबरोबर, गेल्या वर्षीचे सागर कांबळे शाळा धावडशी, सुभाष जाधव शाळा कटापूर, सुजाता कुंभार शाळा गोसावीवाडी, शिवाजी कदम शाळा कुळकजाई, विष्णू पाचांगणे शाळा बुधावलेवाडी, आबासाहेब जाधव शाळा होळीचागाव, सचिन खराडे शाळा निंभोरे, गणेश तांबे शाळा कारंडेवस्ती मलवडी, दत्तात्रय चव्हाण शाळा शिरवळ, अंजना जगताप शाळा लोणी, महेश सकपाळ शाळा धावडी, संजय लोखंडे शाळा खानापूर, सुभाष दळवी शाळा वाघदरे, संतोष लोहार शाळा निपाणीमुरा, योगिता बनसोडे शाळा मुळगाव, विद्या गाढवे शाळा घाटेवाडी, सुवर्णा शेजवळ शाळा कोर्टी, सुरेखा वायदंडे शाळा आगाशिवनगर नं १, सुजाता ढेबे शाळा कुंभरोशी यांना जाहीर झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.

हेही वाचा: बेळगाव: सहा मराठी शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार

‘सकाळ’ मित्र समूहातील शिक्षकांचा गौरव

दै. ‘सकाळ’च्या ‘उपक्रमशील शिक्षक’ समूहातील प्रवीण क्षीरसागर (सातारा), प्रदीप कुंभार (कऱ्हाड), दादासाहेब गायकवाड (पाटण), अकबर मुलाणी (कोरेगाव), राजश्री पोतदार (वाई) यांचा, तसेच ‘तंत्रस्नेही शिक्षक’ समूहातील धनाजी कातांगळे (सातारा) यांचा यंदाच्या जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांत समावेश आहे. गेल्या वर्षीच्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांत सुभाष जाधव (कोरेगाव), गणेश तांबे (फलटण) या उपक्रमशील शिक्षकांचा, तसेच संतोष लोहार (जावळी), सुरेखा वायदंडे (कऱ्हाड), सुजाता ढेबे (महाबळेश्वर) या तंत्रस्नेही शिक्षकांचा समावेश आहे.

loading image
go to top