Khambatki Ghat : पुणे-बंगळुर महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे मार्गात अडथळा

दिवाळी सुट्टीमुळे चाकरमानी आपल्या घरी जात असल्याने या रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक आहे.
Big traffic jam at Khambatki Ghat
Big traffic jam at Khambatki Ghatesakal
Summary

पुण्याकडे वाहतूक सुरळीतपणे धिम्या गतीने सुरु आहे.

खंडाळा : दिवाळीच्या (Diwali) सलग सुट्ट्यांमुळे आज सकाळी सात वाजल्यापासून सातारा बाजूकडे जाणाऱ्या पुणे-बंगळुर महामार्गावरील खंबाटकी घाट (Khambatki Ghat) जाम झाला आहे. तर, पुण्याकडे वाहतूक सुरळीतपणे धिम्या गतीने सुरु आहे.

Big traffic jam at Khambatki Ghat
आमदारकी पणाला लावली, पण पाटलांनी करुन दाखवलंच! काळम्मावाडीचं पाणी थेट पुईखडी केंद्रात, कोल्हापूरकरांचं स्वप्न झालं पूर्ण

दिवाळी सुट्टीमुळे चाकरमानी आपल्या घरी जात असल्याने या रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक आहे. यातच घाट माथ्यावर भैरवनाथ मंदिराजवळ ट्रक बंद पडल्यामुळे आणि इथेच दोन लेन असल्याने वाहनांची कोंडी झालीये.

Big traffic jam at Khambatki Ghat
Karnataka NIA : बंगळुरात तब्बल 10 हजार बांगलादेशी बेकायदेशीर स्थायिक; NIA च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

यावेळी वाहतूक पोलिस जाधव, लोणार, तात्या फरांदे व डेरे हे घाटात थांबून वाहतूक सुरळीत करीत आहेत. तर, काहींनी सेवा रस्त्यावर आपली वाहने वळविल्याने घाटच्या पायथ्याला वाहनांची मोठी कोंडी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com