
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी आज प्रदेश कार्यालयाकडून जाहीर झाल्या. यामध्ये सातारा जिल्हाध्यक्षपदी कऱ्हाड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीने पक्षश्रेष्ठींनी सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्यभरात नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू होती.