कोयना धरण परिसरात भुकंप; जिवीत हानी नाही

विजय लाड
Saturday, 15 August 2020

भूकंपाने कोणतीही जिवीत अथना वित्त हानी झालेली नाही, असे तहसीलदार कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
 

कोयनानगर (जि.सातारा) : कोयना धरण परिसर आज सकाळी  दहा वाजून 22 मिनीटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. त्याचा रिश्टर स्केल 3.1 इतका होता. या भुकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून 13.60 किलोमीटरवर वारणा खोऱ्यात चिखली गावाच्या ईशान्येस दहा किलोमीटरवर होता. त्याची खोली आठ किलोमीटर होती.
काेयना धरणातून साेडलेले पाणी पाहा  

मुसळधार पावसाबरोबरच आत्ता झालेल्या भुकंपाच्या धक्क्याने घबराट आहे. भूकंपाने कोणतीही जिवीत अथना वित्त हानी झालेली नाही, असे तहसीलदार कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

CoronaUpdate : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कृष्णा रुग्णालयात दाखल 

दरम्यान आज (शनिवार) सकाळी 11 वाजता काेयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुट नऊ इंचाने उघडण्यात आले हाेते. सांडव्या वरून 9360 क्यूसेक व धरण पायथा विजगृह मधून 1050 क्यूसेक  असा एकूण 10410 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात झाला.

मैदानावरचा आपला सगळ्यांचा हिरो घरात कसा असतो? तो मुलांशी कसा वागतो? तो पालक म्हणून कसा आहे? वाचा सविस्तर

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake In Koyna Region No Causality Found