

Tanajirao Salunkhe from Kiwal village showcasing his bountiful ginger harvest — a proud example of modern farming success.
Sakal
मसूर: कमी पाण्यावर येणारे नगदी पीक असणाऱ्या आले पिकाची किवळ (ता. कऱ्हाड) येथील प्रगतशील शेतकरी व माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे यांनी लागवड करून अवघ्या दीड एकर क्षेत्रात १० लाखांचे विक्रमी उत्पन्न घेतले. ७५ गाड्या आल्याची विक्री केली. मात्र, दरातील जुन्या- नव्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला.