
दहिवडी : शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या दोन किंवा अधिक गावांमध्ये जमिनी आहेत. या सर्व जमिनींची एकत्रित माहिती फार्मर आयडीवर नोंदवली जात नसल्याने पीक नुकसान भरपाई आणि इतर शासकीय लाभापासून ते वंचित राहात आहेत. शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले.