
Police and villagers at Mogarale after a farmer’s extreme protest against road widening; tension grips the area.
Sakal
बिजवडी : मोगराळे (ता. माण) येथे आपल्या जमिनीतून दहशत व दबाव टाकून रस्ता करण्यासाठी आंब्याची फळबाग काढण्यासाठी आलेल्या मशिनरींना विजय जगदाळे या शेतकऱ्याने विरोध केला होता. त्यांचा विरोध झुगारून लावण्यासाठी महामार्ग विभागाने पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर दबाव टाकला होता. त्यामुळे त्यांनी घरात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला असला तरी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात व तोंडावर पेट्रोल पडल्याने त्यांना दहिवडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.