

Karad farmers protest with a rasta roko demanding ₹4,000 sugarcane rate; agitation spreads across Satara district.
Sakal
तांबवे : ऊसदरासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून साकुर्डी पेठ (ता. कऱ्हाड) येथे संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून अर्धा तास वाहने अडवून धरली. उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, पहिला हप्ता तीन हजार ७५० रुपये मिळावा व कारखान्याचे वजनकाटे तपासण्यात यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला. यादरम्यान कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांना निवेदन देण्यात आले.