

Sugarcane farmers rejoice as factories announce a historic ₹3500 first installment.
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: यंदा एफआरपीचा विचार करूनच साखर कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केला आहे. कारखान्यांनी शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची वाट न बघता सरासरी ३५०० रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या इतिहासात पहिल्यांदा पहिला हप्ता जादा मिळणार आहे. सह्याद्री, कृष्णा, रयत, जयवंत शुगर्स आदी कारखान्यांनी पहिला हप्ता ३५००, तर लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने तीन हजार पहिला हप्ता जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनाही त्याच तोलामोलाचा दर द्यावा लागणार आहे.