esakal | टोमॅटो विक्रीला पाठवून 362 रुपयांची पदरमोड
sakal

बोलून बातमी शोधा

टोमॅटो-

सध्या टोमॅटोचे दर दीड रुपया ते दोन रुपये किलो असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.

टोमॅटो विक्रीला पाठवून 362 रुपयांची पदरमोड

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा (सातारा): शेतकऱ्याने काबाडकष्टाने पिकविलेल्या मालास कवडीमोलाचा दर मिळतो. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात. त्याचा अनुभव येथील सागर गुरव या शेतकऱ्यास प्रत्यक्ष आला. येथील सागर या शेतकऱ्याने पुणे मार्केटला पाठवलेल्या टोमॅटोला नफा मिळण्याऐवजी उलट ३६२ रुपयांचा झालेला तोटा भरा, अशी पट्टी (बाजारभाव रक्कम) आल्याने त्यांनी आपले हात डोक्यावर ठेवले.

हेही वाचा: गोंदीसह आटकेमध्ये नदीकाठी मगरीचे दर्शन! नागरिकांत भीतीचे वातावरण

शेतीमालास दर मिळत नाही, असे नेहमीच कानावर येते. सध्या टोमॅटोचे दर दीड रुपया ते दोन रुपये किलो असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सागर गुरव यांनी कुमजाई पट्टी या शेतात भांडवल गुंतवून उत्पादन केलेल्या टोमॅटो गुलटेकडी- पुणे मार्केटला पाठविले. २५० किलो टोमॅटोस फक्त २० रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे सागर यांना दोन हजार ५०० रुपये मिळाले.

हेही वाचा: "गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा"

मात्र, तोलाई, भराई, आडत व गाडीभाडे असे मिळून एकूण दोन हजार ८६२ रुपयांचा खर्च झाला. त्यामुळे या शेतकऱ्यास ३६२ रुपये खिशातून भरावे लागले. टोमॅटोचा गडगडलेला दर पाहून सारेच अचंबित झाले आहेत. जमीन मशागत, भांडवल, मेहनतही त्यातून मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वच टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

loading image
go to top