'शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढाऱ्यांच्या मागे न धावता, न्यायासाठी लढलं पाहिजे' I Shetkari Sanghatana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shetkari Sanghatana

शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी राजकीय पुढाऱ्यांच्या मागे न धावता, शेतकरी संघटनेच्या विचारांनी प्रेरणा घेऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे.

'शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढाऱ्यांच्या मागे न धावता, न्यायासाठी लढलं पाहिजे'

कुडाळ (सातारा) : आगामी काळात प्रत्येक गावांमध्ये शेतकरी संघटना (Shetkari Sanghatana) स्थापन करून शेतकऱ्यांचे नेते स्वर्गीय शरद जोशींचे (Farmer leader Sharad Joshi) विचार तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार असून कोणालाही न घाबरता अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष कमलाकर (नाना) भोसले (Kamlakar Bhosle) यांनी बोलताना केले. कुडाळ (ता. जावळी) येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सीमाताई नरोडे, जावळी तालुकाध्यक्ष विश्वास रांजणे, रवींद्र परामने, मोहनराव शिंदे, प्रकाश परामने, प्रगतशील शेतकरी अजीजभाई मुजावर व शेतकरी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष भोसले पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी राजकीय पुढाऱ्यांच्या मागे न धावता, शेतकरी संघटनेच्या विचारांनी प्रेरणा घेऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे. जिल्ह्यातील ऊस कारखानदारांनी मागील वर्षीच्या उसाचे सर्व बिल एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावेत, अन्यथा ऊस कारखानदार चेअरमन आणि संचालक मंडळ यांना कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही. तसेच जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटी आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस कर्जाची जप्ती वसुली करण्यासाठी आलेल्या वसुली अधिकाऱ्यांचाही योग्य समाचार घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा: राजकारणात ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला

Shetkari Sanghatana

Shetkari Sanghatana

यावेळी जावळी तालुका शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी रूपालीताई गावडे यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी बोलताना सीमा नरोडे म्हणाल्या, शेतकरी कुटुंबातील, महिलांनी शेतकरी संघटनेमध्ये संघटित होऊन स्वतःसक्षम झाले पाहिजे, तरच आपले कुटुंब समृद्ध होऊ शकते. सातारा जिल्ह्यामध्ये यांच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना महिला स्वयंरोजगार योजनेतून ग्रह उद्योग उभारणीआठी सहकार्य होईल. यावेळी अनिल घनवट, रवींद्र परामने, प्रकाश परामणे, अजीज भाई मुजावर यांनीही प्रशासनाकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट या विषयी परखड शब्दात आपले मत व्यक्त केले.

हेही वाचा: VIDEO : दिल्ली विमानतळाचा माकडानं घेतला ताबा

शेतकऱ्यांकडून मेळाव्यातच वीज बिलांची होळी

महावितरणने शेतकर्‍यांना दिलेली बोगस वीज बिले न भरण्याचा कानमंत्र उपस्थित शेतकर्‍यांना जिल्हाध्यक्ष कमलाकर (नाना) भोसले यांनी देताच, शेतकऱ्यांनी मेळाव्याला येतानाच सोबत आणलेल्या वीज बिलांची होळी करण्यात आली.

Web Title: Farmers Meeting Of Shetkari Sanghatana At Kudal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :shetkari sanghatana
go to top