
Farmers threaten protest against Road Authority over Dahivadi–Vita highway land dispute.
Sakal
-संजय जगताप
मायणी : येथील चांदणी चौकातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दहिवडी- विटा या टप्प्याचे रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, रुंदीकरण करण्यापूर्वी बाधित शेतकऱ्यांना कसलीही पूर्वसूचना दिलेली नाही. नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाच्या मनमानी विरोधात विविध गावांतील शेतकरी दंड थोपटू लागले आहेत.