उरुल घाटात ट्रक ड्रायव्हरवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी आरोपींना केलं जेरबंद

आरोपीना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची न्यायालयीन कस्टडी
उरुल घाटात ट्रक ड्रायव्हरवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी आरोपींना केलं जेरबंद
उरुल घाटात ट्रक ड्रायव्हरवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी आरोपींना केलं जेरबंद sakal

सातारा : दोन दिवसापूर्वी उरुल घाटात ट्रक ड्रायव्हरवर चाकूने जीवघेणा हल्ला करून जबरी चोरी केलेल्या आरोपींना मल्हारपेठ पोलिसांनी केल जेरबंद आणी अटक आरोपीना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची न्यायालयीन कस्टडी मिळाली आहे.

उरुल घाटातील दुसऱ्या वळणावर दिनांक 15 10 2021 रोजी आली इस्माईल कशेठ रा.राजापूर जिल्हा रत्नागिरी हा ट्रक चालक एम एच 09 CU 4377 हा प्लास्टर पावडर घेऊन रत्नागिरी येथून मल्हारपेठ मार्गे पुण्याकडे जात असताना मध्यरात्री 1 वाजता उरुल घाटातून जात होता घाटाच्या दुसऱ्या वळणावर पाठीमागून आलेल्या मोटरसायकल वरील युवकांनी ट्रक अडवून त्यांचे ट्रकचे केबिनमध्ये प्रवेश करून पैशाची मागणी केली फिर्यादी अली स्माईल शेठ यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने त्याचे हातावर डोक्यावर छातीवर चाकूने वार करून फिर्यादी यास गंभीर जखमी केले व फिर्यादीचे शर्टाच्या खिशातून जबरदस्तीने पाच हजार रुपये काढून घेऊन आरोपी पळून गेले सदर घटनेबाबत अली स्माईल शेठ यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

उरुल घाटात ट्रक ड्रायव्हरवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनी आरोपींना केलं जेरबंद
विमानतळ निर्बंधाबाबत भीती बाळगू नये; देसाईंचं नागरिकांना आवाहन

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक सातारा उपविभागीय पोलिस अधिकारी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील तसेच मल्हार पेठ पोलीस स्टेशन च्या स्थापने तपास पथके तयार करुन उंब्रज कराड परिसरात तपास चालू ठेवला त्या दरम्यान गुन्ह्याचे घटनास्थळी मोटरसायकलचे तुटून पडलेली स्पेअर पार्ट वरून गुन्ह्यातील मोटार सायकलचा व आरोपीचा शोध चालू झाला गोपनीय बातमीदार मार्फत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल बाबत माहिती मिळावी त्या आधारे सदरचा गुन्हा करणारे आरोपी मिळून आले त्यामध्ये ऋषिकेश दादासो माने वय 20 रा चरेगाव व ऋषिकेश अशोक शितोळे वय 21 रा शितळवाडी ता कराड यांची नावे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली एचएफ डीलक्स मोटर सायकल तलवार चाकू जप्त करण्यात आली आहे.

सदर आरोपींना न्यायदंडाधिकारी पाटण यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे तसेच दीड महिन्यापूर्वी उरुल घाटात अशाच प्रकारे झालेल्यागुन्ह्याची कबुली दिली असून उरुल घाटात ट्रक चालक सादिक आदिम सगरी रा सोलापूर याचा ट्रक क्रमांक mh 25 u 1103 या ट्रकने प्रवास करत असताना त्याला अडवून व मारहाण करून दोन मोबाईल व बावीसशे रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेले चे कबुली दिली आहे .तसेच अशा प्रकारची इतर ठिकाणी काही गुन्हे केले आहेत का याबाबत तपास सुरू असून दोन दिवसांमध्ये मल्हारपेठ पोलिसांनी तपास चक्र फिरवून जबरी चोरी केलेल्या आरोपींना ताब्यात घेतले आहे गुन्ह्याचे तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, सहाय्यक फौजदार वेताळ ,अंकुशी, पोलीस हवालदार घाडगे, पोलीस नाईक अमोल पवार, संदीप घोरपडे ,पृथ्वीराज पाटील ,पोलीस कॉन्स्टेबल वैभव पवार ,शेडगे ,संभाजी जाधव, चालक थोरवे, साळवी ,यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com