
Karad Lok Adalat witnesses father-son reconciliation; ₹6.25 crore settlement brings emotional closure.
Sakal
कऱ्हाड : चार वर्षांपासून एकमेकाचे तोंडही न पाहणारे बाप-लेक लोकन्यायालयाच्या निमित्ताने एकत्र आले. दोघांतील कटुता संपवून एकमेकाला घट्ट मिठी मारली, मुलाने चूक मान्य करून वडिलांचे पाय धरले, तर वडिलांनीही चूक झाल्याचे सांगून मुलाची समजूत काढली. हे मनोमिलन पाहून न्यायालयाचे डोळेही पाणावले. चार वर्षांचा दुरावा एका लोकन्यायालयात संपुष्टात आला. एकमेकांविरुद्ध असणाऱ्या फौजदारी आणि दिवाणी खटले एका मिनिटात काढून दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. ही घटना आहे कऱ्हाडच्या लोकन्यायालयातील!