वनविभागानं घडवली बिबट्यांच्या बछड्यांची अन् मादीची भेट

कऱ्हाड तालुक्यातील भोळेवाडी येथील शिवारात ऊस तोड सुरु असताना दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली
बिबट्या मादी.
बिबट्या मादी.Sakal

कऱ्हाड - कऱ्हाड तालुक्यातील भोळेवाडी येथील शिवारात शनिवारी ऊस तोड सुरु असताना पंचवीस ते तीस दिवसांची दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. कराड वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी दोन्ही पिलांना सुरक्षित ठिकाणी दिवसा उजेडी हलवले. त्याच संध्याकाळी पुन्हा मादी बिबट्या आपल्या पिल्लांसाठी आक्रमक होऊ नये म्हणून, पिल्ले ज्याठिकाणी सापडले त्याच ठिकाणी पुन्हा क्रेटमध्ये ठेवले व क्रेटच्या बाजूला निगराणीसाठी कॅमेरे लावले. मात्र मादी पिल्ले काही कारणाने दोन दिवस घेऊन जात नव्हती. शनिवार नंतर सोमवारी तीन दिवशी वनविभागाने दोन्ही बिबट्याच्या पिल्लांची काळजी घेतली. वनविभागाचे डॉ. चंदन सवने यांनी दोन्ही पिलांना विशेष काळजी घेत त्यांना आवश्यक ते पोषण आहार व पाणी दिवसातून तीन वेळा दिले. उष्णतेमुळे विशेष काळजी घेण्यात आली होती. सापडलेल्या पिलांत एक मादी व एक नर असे पिलू होते. त्यापैकी नर पिल्लू जास्त अशक्त होते. त्याची शेपटी व एका मागील पायाला इजा होती. त्यासाठी तीन दिवस सकाळच्या सदर मध्ये डाॅ. चंदन यांनी त्या नर पिलावर उपचार केले. काल (सोमवारी) संध्याकाळी पुन्हा ५.३० वाजता पिल्ले घेऊन घटना स्थळी गेले. त्यांच्या सोबत वनक्षेत्रपाल तुषार नवले, महेश झांजुर्णे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, चंदन सावने, वनरक्षक शीतल पाटील, वनमजूर शंभू माने व अमोल पाटील सोबत होते.

पिल्ले सापडलेल्या ठीकाणापासून शेजारी असलेल्या नांगरलेल्या शिवारात पिल्ले ठेवण्याची नवीन जागा निवडून भाटे यांनी विशिष्ठ पद्धतीने क्रेट मातीत ठेऊन त्यामध्ये पिल्ले ठेवली. तसेच क्रेटच्या दोन्ही बाजूला मादीची हालचाल टिपण्यासाठी कॅमेरे लावले. त्या क्रेटच्या आजू बाजूला दोन दिवसांपासून बिबट्यांच्या त्या पिलांचे मुत्र गोळा करून ठवलेल होते जे क्रेटच्या आजू बाजू परिसरात मुदामून काही झाडांवर व दगडांवर टाकले. त्यामुळे मादीला पिलांचा वास जावा. हा हेतू होता. एक पिल्लू जे अगदी सशक्त होते त्याला मुद्दामून दुपारपासून उपाशी ठवले होते जेणेकरून ते भुकेले असल्यामुळे रात्री आपल्या आईला आवाज देईल. अगदी झालेही तसेच सशक्त पिल्लू रानात ठेवल्यावर जोर जोरात आपल्या आईला आवाज देऊ लागले. रात्री ११.३७ वाजता मादी बिबट्या आली व ती शिवारात रात्री १.३० वाजेपर्यंत पिलांसोबत होती. नंतर ती पिल्लांना सुखरूपपणे घेऊन गेली. यासाठी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झाणझुरणें वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, डॉ चंदन सवने, वनरक्षक म्होप्रे शीतल पाटील, उत्तम पांढरे, भरत खटावकर वनमजूर शंभू माने वनमजूर अमोल पाटील यांनी मोलाची कामगिरी पार पाडली व एका आईचे व तिच्या पिलांचीभेट घडवून आणली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com