esakal | Good News : रुग्णांसाठी 'आधारवड' ठरलेल्या 'कृष्णा'तून पाच हजारजण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Krishna Hospital

कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचा आज पाच हजारांचा टप्पा पूर्ण केला.

Good News : रुग्णांसाठी 'आधारवड' ठरलेल्या 'कृष्णा'तून पाच हजारजण कोरोनामुक्त

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी (Corona patient) आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने (Krishna Hospital) कोरोनामुक्तीचा आज पाच हजारांचा टप्पा पूर्ण केला. कृष्णा हॉस्पिटलमधून आज 28 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दुसऱ्या लाटेतही एक हजार 753 रुग्ण कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले आहे. त्यामुळे कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या सेवेचे कौतुक होत आहे. (Five Thousand Corona Patient Discharged From Krishna Hospital In Karad Today)

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे (Krishna Charitable Trust) अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले (Dr. Suresh Bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात योगदान दिले. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे मागील वर्षी 18 एप्रिल 2020 रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तांची मालिकाच सुरू झाली.

हेही वाचा: 'कृष्णा'त काँग्रेसची मते विभागणार; मंत्री कदमांनंतर उंडाळकरांची भूमिका जाहीर

तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी देखरेखेखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत असून आजअखेर कृष्णा हॉस्पिटलने पाच हजार 23 रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना डॉ. भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. विश्वास पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; उपमुख्यमंत्र्यांना साकडे

Hospital

Hospital

साताऱ्यात 980 जणांना डिस्चार्ज

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 980 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  • एकूण नमूने - 937989

  • एकूण बाधित - 182928

  • घरी सोडण्यात आलेले - 170576

  • मृत्यू - 4120

  • उपचारार्थ रुग्ण - 8504

Five Thousand Corona Patient Discharged From Krishna Hospital In Karad Today

loading image