

Pawarwadi land dispute turns violent; accused sentenced to five years rigorous imprisonment for life-threatening assault.
Sakal
रहिमतपूर: पवारवाडी (ता. कोरेगाव) येथे २५ सप्टेंबर २०१८ रोजी जमीन वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. हा निकाल न्यायाधीश अरविंद शं. वाघमारे यांच्या न्यायालयात देण्यात आला.