esakal | शहराच्या मार्केट यार्ड परिसरात झळकले वेगवेगळे फ्लेक्स
sakal

बोलून बातमी शोधा

शहराच्या मार्केट यार्ड परिसरात झळकले वेगवेगळे फ्लेक्स

रस्त्याचे मनोगत नागरिकांनी गांधीगिरी स्टाईलने सुजान नागरिकांनी व्यक्त केल्याने त्याची सकाळपासूनच शहरात चर्चा होती.

शहराच्या मार्केट यार्ड परिसरात झळकले वेगवेगळे फ्लेक्स

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): अरे... मला कुणीतरी दुरूस्त करा रे...इलेक्शन टाईम आ गया मेरा नंबर कब आयेगा...आयुष्य खूप सुंदर आहे. मतदान विचार करूनच कर...किती अपघातानंतर मला दुरूस्त करणार असे एक नव्हे तर दहा वेगवेगळे फ्लेक्स शहराच्या मार्केट यार्ड परिसरात आड अचानक झळकले. ते कार्वे नाका ते मार्केट यार्ड रस्त्याचे मनोगतच होते. रस्ता बोलला असता तर कदाचित अशीच काहीशी मते त्याने व्यक्त केली असती. रस्त्याचे मनोगत नागरिकांनी गांधीगिरी स्टाईलने सुजान नागरिकांनी व्यक्त केल्याने त्याची सकाळपासूनच शहरात चर्चा होती.

हेही वाचा: कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

कार्वे नाक्यासह वाढीव हद्दवाढ भागाला शहरातून ये-जा करण्यासाठीचा असलेला हमरस्ताच खड्ड्यात आहे. शहरातील तो रस्ता किलोमीटरचा आहे. त्यात खड्डेच जास्त आहेत. पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष त्याला कारणीभूत आहे. कार्वे नाका परिसरातील ५० हून अधिक उपनगरांतील नागरिकांना त्या रस्त्याच्या खड्ड्यांची यातना सहन करावी लागत आहे. त्याच्या दुरुस्तीच्या नावाने ओरडच आहे. दुरुस्ती जरी झाली तरी ती जुजबी असते. दहा वर्षांपासून रस्ता तर झालेलाच नाही. त्याशिवाय दुरुस्तीच्या नावाखाली होणाऱ्या मलमपट्टीतून काहीही साध्य झालेले नाही.

हेही वाचा: कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

उपनगरांना जोडणारा हा रस्ताही दयनीय स्थितीत आहे. हद्दवाढ भागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून मार्केट यार्ड ते कार्वे नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पाहिले जाते. दिवस-रात्र वाहतुकीचा ताण येथे आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, ताकारी, इस्लामपूर, तासगावसह कऱ्हाड तालुक्यातील अनेक मोठ्या गावांचा संपर्क याच रस्त्यावरून होतो. तो रस्ता सध्या दयनीय स्थितीत आहे. त्या रस्त्याने जाणे म्हणजे कंबरेचे दुखणे मागे लावून घेण्यासारखा प्रकार आहे. दहा वर्षांपासून रस्ताच झालेला नाही. नुसती दुरुस्ती होते, तीही जुजबीच, दुरुस्तीनंतर त्यावरील खडी कधीही पडलेली नाही. त्या भागातील नागरीकांनी वारंवार मागणी करूनही रस्ता झालेला नाही. अखेर त्या भागातील नागरीकांचा संताप एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रकट झाल्याचे पहावयास मिळाले.

हेही वाचा: 'नारायण राणे मुर्दाबाद..'; कऱ्हाड, साताऱ्यात सेना आक्रमक

त्या भागातील काही सुज्ञ नागरीकांनी फ्लेक्स लावून पालिका, त्या भागातील नगरसेवकांचा निषेध नोंदवला आहे. त्या भागात काम केल्याचा ढोल बढविणाऱ्या नगरसेवकांना फ्लेक्सबाजी म्हणजे चपराक ठरली आहे. सांगली जिल्ह्याला जोडला जाणारा हमरस्ता ना दुरूस्त असल्याने त्याची कठीण स्थिती झाली आहे. नागरीकांनी केलेल्या आगळ्या वेगळ्या निषेधाने मात्र रस्ता व त्याची ना दुरूस्ती सकाळापासून शहरात चर्चेची ठरली आहे.

loading image
go to top