बोटीचे सारथ्‍य अन्‌ जंगल वाटेतून प्रवास!

खिरखिंडीतील सावित्रींच्या तीन लेकींची शिक्षणासाठी धडपड; अंधारीपर्यंत दररोजची जीवघेणी धावपळ
kas
kas sakal

कास : दुर्गम खिरखिंडीतील तीन मुली रोज बोटीचे सारथ्य करत गावापासून कोसो दूर असलेल्या अंधारी गावात येऊन शिक्षण(complete education) पूर्ण करत आहेत. बोटीतून उतरून ती बोट शेंबडीतील दत्त मंदिरात लावून तेथून कास जवळच्या अंधारी गावात डोंगरकपारीतून, जंगली श्वापदांच्या मार्गातून चालत या सावित्रीच्या लेकी रोजच हे दिव्य पार करत आहेत.

kas
फास्ट टॅग स्कॅन न झाल्याने आनेवाडी टोलनाक्यावर वाहनचालकाला मारहाण

खिरखंडी गावाचे नाव काढले तरी अंगावर काटा यावा, अशी परिस्थिती. दुर्गम बामणोली भागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात कोयना नदीच्या पलीकडे वसलेले हे गाव. गावासाठी रस्ता ही गोष्टच अस्तित्वात नाही. त्यामुळे जगाशी संपर्क तोही फक्त बोटीतून. गावात पहिली ते पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा. पूर्वी ती वस्तीशाळा होती. शासनाच्या वस्तीशाळा योजनेतून २००१ मध्‍ये गावच्या नशिबात शाळा आली.

शिक्षक शंकर भोसले यांनी कठोर मेहनत घेऊन शाळा नावारूपाला आणून शाळेला जिल्हा परिषद शाळेचा दर्जा मिळवून दिला. प्राथमिक शिक्षणाची सोय झाली, तरी सहावीनंतर काय, हा प्रश्न होताच. पुढील शिक्षण घ्यायचे, तर शिवसागर ओलांडावाच लागणार आणि मुलींनी हे शिवधनुष्य पेलले. अशा स्थितीतही या गावातील तीन मुली रोज बोटीचे सारथ्य करत गावापासून कोसो दूर असलेल्या अंधारी गावात येऊन शिक्षण पूर्ण करत आहेत. नुसती बोटीची कसरत असती एक वेळ परवडली असती पण बोटीतून उतरून ती बोट शेंबडीतील दत्त मंदिरात लावून तेथून कास जवळच्या अंधारी गावात डोंगरकपारीतून, जंगली श्वापदांच्या मार्गातून चालत येणे म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखेच. पण, या सावित्रीच्या लेकी रोजच हे दिव्य पार करत आहेत.

kas
मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा; फास्ट टॅग सक्तीचे असल्याने एकच लेन

शेंबडीतून अंधारीपर्यंत दऱ्याखोऱ्यातून चालत येणे व पुन्हा चालत जाणे, असा हा दिनक्रम. यात कधीही खंड पडत नाही. सकाळी सात वाजता घर सोडणाऱ्या मुली सायंकाळी उशिरा तिथून पुन्हा आपल्या घरी जातात. दिवसभर थकलेल्या असल्या तरी दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहाने शाळेत येतात. माजी आमदार जी. जी. कदम प्रतिष्ठान संचलित अंधारी येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये सारिका सपकाळ, पारू सपकाळ या बारावीत, तर प्रियांका सपकाळ ही अकरावी वाणिज्य शाखेत शिकत आहे. विनाअनुदानित तत्त्‍वावर चालणाऱ्या या कॉलेजमध्ये प्राचार्य गंगाराम पडगे, प्रा. विनायक पवार, प्रा. प्रियांका पडगे हे शिक्षक सेवा करत असून अशा दुर्गम भागात अनुदानित कॉलेजची गरज आहे.

हे विनाअनुदानित कॉलेज (college)नसेल, तर या दुर्गम भागातील मुलांचे शिक्षण(education) थांबले असते. त्यामुळे शासनाने भावी पिढीच्या हितासाठी दुर्गम भागातील या शाळा, कॉलेजला मदत करावी.

- गंगाराम पडगे, प्राचार्य, ज्युनिअर कॉलेज, अंधारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com